‘त्या’ मृतदेहाबाबत घातपाताचा संशय !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- पर्यटनावर आलेला एक अज्ञात पर्यटक दुपारी चार वाजताच्या सुमारास पाण्यात बुडाला. शुक्रवारपासून पोलिस व स्थानिक लोकांकडून शोध घेण्यात येत होता.

पण त्यात यश मिळत नव्हते. शनिवारी (१० जुलै) सायंकाळच्या सुमारास एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर पोलिसांकडून तो कोणाचा आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.

कारण घटनास्थळावरून बूट, पायमोजे व इतर साहित्य बेवारस मिळून आल्यानंतर हा प्रकार म्हणजे दुर्घटना अपघात, की आत्महत्या, की घातपात आहे? याचा शोध पोलिस घेत आहेत.

कुणाच्या पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडलाय का हेही पोलिस तपासून पहात आहेत. या अज्ञात पर्यटकासोबतच आणखीन दोन अज्ञात पर्यटक बरोबर असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळेच हा प्रकार आत्महत्येचा नसून घातपाताचा असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील ते दोन पर्यटक कोण होते व घटनास्थळावरून ते का निघून गेले याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24