SUV Cars : 2022 मध्ये ‘ह्या’ SUV कार्सनी ग्राहकांच्या मनावर केला राज्य ! लिस्ट पाहून व्हाल तुम्ही थक्क

SUV Cars :  या नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही देखील नवीन SUV कार खरेदी करून करणार असाल तर आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये आज मागच्या वर्षात ग्राहकांच्या मनावर राज्य करणाऱ्या पाच दमदार SUV कार्सबद्दल माहिती देणार आहोत. ही माहिती जाणून तुम्ही देखील तुमच्यासाठी बेस्ट SUV कार खरेदी करू शकणार आहे. चला तर जाणून घेऊया या पाच दमदार SUV कार्सबद्दल संपूर्ण माहिती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

TATA Nexon

टाटा नेक्सॉन 2022 मधील सर्वात लोकप्रिय आणि बेस्ट सेलर SUV च्या यादीत शीर्षस्थानी आहे. नोव्हेंबरपर्यंतच्या विक्री अहवालात टाटा मोटर्सने एकूण 11 महिन्यांत 1.5 लाखांहून अधिक वाहनांची विक्री केली आहे. TATA Nexon Electric ला देखील भारतात सर्वाधिक मागणी आहे, दर महिन्याला सरासरी 14 हजारांहून अधिक लोक हे वाहन खरेदी करतात.

Advertisement

Hyundai Creta

टाटा नेक्सॉन नंतर 2022 मध्ये SUV सेगमेंटमध्ये Hyundai Creta वाहनांची सर्वाधिक खरेदी झाली आहे. कंपनीने 2022 मध्ये Hyundai Creta च्या 1,30,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली आणि 2022 मधील सर्वोत्कृष्ट SUV च्या यादीत अव्वल दुसरे स्थान कायम राखले.

Advertisement

Maruti Brezza

मारुती ब्रेझा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मारुती ब्रेझा 2022 मध्ये सब कॉम्पॅक्ट SUV म्हणून लॉन्च करण्यात आली होती. टाटा नेक्सॉनला टक्कर देण्यासाठी कंपनीने हे वाहन लॉन्च केले. मारुती ब्रेझाला एकूण 11 महिन्यांत सुमारे 1 लाख 20 हजार ग्राहकांचे प्रेम मिळाले.

creta-2020-5fc8

Advertisement

TATA Punch

तर चौथ्या क्रमांकावर  2022 मध्ये टाटा पंच खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती. यामुळेच या वाहनाचे नाव बेस्ट 2022 SUV च्या यादीतही नोंदवले गेले आहे. 2022 मध्ये टाटा पंचची सुमारे 1 लाख 20 हजार वाहने खरेदी करण्यात आली.

Hyundai Venue

Advertisement

पाचव्या क्रमांकावर Hyundai Venue चे नाव समाविष्ट आहे. मारुती ब्रेझा प्रमाणेच, Hyundai Venue ला देखील 2022 मध्ये नवीन अपडेट मिळाले आहे. देशात या वाहनाला खूप मागणी होती. नोव्हेंबरपर्यंत ह्युंदाई व्हेन्यूच्या 1 लाख 12 हजारहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. महिन्याच्या आधारे हे वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या सरासरी 10 हजारांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा :- Driving Licence: ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर आता काळजी नाही ! ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा तुमचा डुप्लिकेट डीएल

Advertisement