Suzuki Scooter : प्रतीक्षा संपली! लाँच झाली सुझुकीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर,किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Suzuki Scooter : देशात महागड्या पेट्रोल आणि डिझेलमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे आता ग्राहकांकडून वाढती मागणी पाहता आता भारतातील दिग्ग्ज टू-व्हीलर कंपनी सुझुकी आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे.

अनेक दिवसांपासून स्कूटर प्रेमी कंपनीच्या या नवीन इलेक्ट्रिक स्कुटरची आतुरतेने वाट पाहत होते. नुकतीच तिची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कंपनीच्या नवीन स्कुटरचा टॉप स्पीड 60 किमी/तास इतका असणार आहे. जाणून घ्या तिची किंमत किती असणार?

एप्रिल ते जून 2023 या तीन महिन्यांसाठी होणार क्षेत्रीय चाचण्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या या नवीन पॉवरफुल स्कूटरवर Suzuki Gachaco Co. लि. या दोन्ही कंपन्या एप्रिल ते जून 2023 या एकूण तीन महिन्यांसाठी सुझुकी ई-बर्गमनच्या क्षेत्रीय चाचण्या घेणार आहेत. या ट्रायलमध्ये ही कंपनीची स्कूटर ऑफिस, शाळा, मार्केट यांसारख्या ठिकाणी फिरणार आहे. त्यानंतर तिची कामगिरी, स्पीड मायलेज इत्यादींचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.

देणार शानदार टॉप स्पीड

सुझुकीची नवीन ई स्कुटर एका चार्जवर 44 किलोमीटर धावू शकते. तसेच तिचा टॉप स्पीड 60 किमी/तास इतका असणार आहे. ही स्कूटर 4.0 kW पॉवर आणि 18 Nm टॉर्क निर्माण करत असून तिची लांबी 1,825 मिमी, रुंदी 765 मिमी आणि उंची 1,140 मिमी इतकी आहे. तर तिच्या सीटची उंची 780 मिमी इतकी आहे.

जाणून घ्या किंमत

लाँच झाल्यानंतर कंपनीची ही स्कूटर बाजारात TVS iQube, Bajaj चेतक आणि Honda Activa Electric शी स्पर्धा करू शकते.परंतु, अजूनही कंपनीने तिची किंमत आणि लॉन्च तारखेबद्दल कोणताही खुलासा केला नाही. मात्र असे सांगण्यात येत आहे की ते 2024 मध्ये लॉन्च केले जाईल आणि सुरुवातीची किंमत 1.5 लाख एक्स-शोरूममध्ये बाजारात उपलब्ध असणार आहे.