स्वाभिमानी शेतकरी संघटनेन महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यलयातच कोंडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-  वीजबिल प्रश्नावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. तसेचज महावितरणने थकीत वीजबिल वसुलीसाठी सुरु केलेली आक्रमक मोहिमेमुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

यातच अनेक संघटना आता यामध्ये सहभागी झाल्या आहेत. नुकतेच शेतकर्‍यांच्या शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडु नयेत तसेच लाकडाऊन काळातील वीजबील माफ करावे या मागणीसाठी वीजवितरण कंपनी आणि सरकारच्या विरुद्ध आज महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

त्याचाच एक भाग म्हणून अकोलेतही विविध सामाजिक संघनटनांच्या जोडीने आंदोलन करण्यात आले. अकोले वीज वितरण कार्यालयास घेराव घालुन वीजवितरण कार्यालयातील वीज बंद करुन वीजवितरण कार्यालयातील आधिकार्र्‍यांना कोंडुन आंदोलन करण्यात आले.

मुख्य अभियंता नाशिक विभाग यांचेबरोबर फोनवर यावेळी आंदोलक शेतकर्‍यांनी चर्चा करुन शेतकर्‍यांच्या रोहित्रांचा खंडीत केलेला वीजपुरवठा पुर्ववत जोडुन देऊन शेतकर्‍यांना मुदत देऊन वीजबील वसुल करावेत व लाकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे या व इतर विषयावर सविस्तर चर्चा करुन

शेतकर्‍यांचे प्रश्न समजुन घेऊन सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले. या आंदोलनात महेश नवले, सुशांत आरोटे, सुनिल पुंडे सुरेश नवले, शुभम आंबरे, दिलीप शेणकर, सोमनाथ नवले, सुधाकर आरोटे,

डॉ. सचिन गुंजाळ, वैभव सावंत, देवा बंगाळ, एकनाथ गजे, सुनिल मोरे, अनिल वाकचौरे, राजेंद्र गजे, मच्छींद्र पानसरे, संतोष घोडके, योगेश राक्षे आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभागी घेतला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24