अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- गुळवेल वजन कमी करणे, त्वचेच्या समस्या आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. असे अनेक लोकांना वाटते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बरेच लोक गुळवेलच्या काढ्याचे सेवन करत आहेत.
तज्ञांच्या मते, या औषधी वनस्पतींचा वापर आहारात केल्याने गंभीर नुकसान आपल्या शरीराला होऊ शकते. मुंबईतील डॉक्टरांना असे आढळले की, सप्टेंबर २०२० ते डिसेंबर दरम्यान गुळवेलचे सेवन केल्याने सहा जणांच्या यकृताचे गंभीर नुकसान झाले आहे.
हे सर्व रुग्ण कावीळ, सुस्तपणाच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात आले होते. यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉक्टर ए. एस सोइन म्हणाले की, यकृत खराब होण्याची पाच प्रकरणे त्यांनी पाहिली आहेत. त्यातील एक रुग्ण तर मरण पावला आहे.
कोरोना कालावधीत, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बरेच लोक गुळवेलचा समावेश दररोजच्या आहार करत आहेत. गुळवेल शरीरात अँटी-ऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. यामुळे बर्याच लोकांचे यकृत खराब होत आहे.
हेपेटोलॉजिस्ट डॉक्टर आभा नगराल यांच्या म्हणण्यानुसार, ६२ वर्षाची एक महिला तिच्या पोटात संबंधित तक्रारीसाठी रुग्णालयात पोहोचली होती. लिक्विड महिलेच्या ओटीपोटात जमा झाले होते, हे यकृत खराब होण्याचे कारण असू शकते.
चार महिन्यांनंतर या महिलेचा मृत्यू झाला. डॉ. आभा यांच्या मते, बायोप्सीच्या अहवालात आम्हाला आढळले की, त्या महिलेने गुळवेलचा काढा पिला होता.
त्याचा अहवाल स्टडी जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हेपेटोलॉजिस्टमध्ये प्रसिद्ध झाला आहे. इंडियन नॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ द लिव्हर यांनी हा अभ्यास प्रकाशित केला आहे.