ताज्या बातम्या

सफाई कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  कोपरगाव शहरातील दत्तनगर परिसरात कोपरगाव नगरपालिका सफाई कामगार राजू मुरलीधर कसाब (३०) याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी घडली.

दरम्यान, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नगरपालिका आरोग्य कंत्राटदाराच्या येथे सफाई कामगार म्हणून तो कामास होता. शुक्रवारी सकाळी राहत्या घराच्या पत्र्याला पत्र्याच्या पाईपाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

याबाबत मृताचा भाऊ संजय मुरलीधर कसाब (वय ३९ ) राहणार दत्तनगर याने कोपरगाव शहर पोलिसात खबर दिली. यावरून कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Ahmednagarlive24 Office