अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जिल्ह्यासह नगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आले आहे.
यामुळे नागरिकांमध्ये देखील दहशतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. नुकतेच नगर शहरातील अत्यंत वर्दळीचा व दाट लोकवस्ती असलेला परिसर नीलक्रांती चौकात शराहणार्या दोन कुटुंबांमध्ये हाणामारीची घटना घडली.
यामध्ये तलवार, लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आला. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सुमेध उर्फ टिंग्या किशोर साळवे (वय 25 रा. निलक्रांती चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
मी पान टपरीवर सिगारेट पिण्यासाठी बसलेलो असताना स्वप्नील सुनील पारधे, सनी अनिल कांबळे आणि अंकुश कांबळे, गौरव गायकवाड, अंकुश अनिल कांबळे, अमोल हिरामन गायकवाड, घार्या दिलीप लोणारे हे तलवार व लाकडी दांडके घेऊन आले.
त्यांंनी अचानकपणे माझ्यावर हल्ला केला व मारहाण केली. टिंग्या साळवेवर खाजगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. तर माया सुनील पारखे (वय 40 रा. निलक्रांती चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
शुक्रवारी रात्री किरण पटेकर याने घराशेजारील रोडवर दारूच्या बाटल्या फोडल्या. गौरव साळवे याने हातात तलवार घेवून शिविगाळ केली.
तसेच कश्यप साळवे आणि हर्षद भोसले यांनी लाकडी दांडके घेवून स्वप्नील पारधे आणि सनी कांबळे यांना ठार मारण्याची धमकी दिली.
माया पारखे यांच्या फिर्यादीवरून आरोपी किरण पटेकर, गौरव साळवे, कश्यप साळवे, सुमित उर्फ टिंग्या साळवे आणि हर्षद भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.