अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- लोणी बुद्रुक गावातील लोणटेक मंदिराजवळ हातात लोखंडी तलवार घेऊन फिरणाऱ्या शाहरुख राजू शेख(वय 22 वर्षे,रा.- लोणी बुद्रुक,ता-राहता) यास पोलिसांनी अटक केली आहे.
लोणी पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक संपत जायभाये हे त्यांना मिळालेल्या खबरीवरून लोणटेक मंदिर,लोणी या ठिकाणी गेले असता
शाहरुख शेख हा बेकायदेशीररीत्या लोखंडी तलवार हातात घेऊन तेथील लोकांवर,समाजात दहशत करण्यासाठी सोबत बाळगतांना मिळून आला.
पोलीस नाईक श्री.जायभाये यांच्या तक्रारीवरून शाहरुख शेख याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 263/2021 शस्त्र अधिनियम 04/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी पो.स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवार यांनी शाहरुख शेखला अटक केली आहे.