अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- भिंगार शहरांमधील अल्पवयीन मुले तसेच वयोवृद्ध पुरुष यांना विषारी मावा खाल्ल्यामुळे कॅन्सर झाला आहे. भिंगारमध्ये दरवर्षी ८ ते १० लोकांना माव्यामुळे जीव गमवावा लागत आहे.
राज्य सरकारने बंदी घालून देखील राजरोसपणे भिंगार शहरामध्ये संपूर्ण पानटपऱ्यांवर खुलेआम मावा विक्री चालू आहे. माव्यामध्ये घातक द्रव्य घालून हा मावा कसा जास्तीत जास्त स्ट्राँग होईल याची मावा विक्री करणाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे.
अशा टपरीचालकांवर छापे टाकून गुन्हे दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त कार्यालयात स. पा. शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे कि, भिंगारमध्ये अन्न व औषध प्रशासन ऑफिस नेमले असून, त्यांनी आतापर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यामुळे त्या अधिकार्यांना मावा विक्रेत्यांकडून हप्ता चालू असावा, याची चौकशी करून त्या अधिकार्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे.
पोलीस प्रशासन हे तात्पुरती स्वरूपाची कारवाई करून मावा विक्री हे अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे खाते असल्यामुळे त्याबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे असल्यामुळे यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी.
ज्या वयात मुलांना काजू, बदाम खायचे आहे, त्या वयात ही लहान मुले मावा खात आहे.मावा विक्री करणार्यांवर कोणतीही दयामाया न दाखवता त्यांची दुकाने सील करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा 16 सप्टेंबरला आपल्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.