नेप्ती उपबाजार समितीच्या ७ एकर जागेमधून मुरुम उत्खनन करणाऱ्या टोळीवर कारवाई करा – अमोल येवले

Published by
Sushant Kulkarni

अहिल्यानगर : नेप्ती उपबाजार समितीच्या ७ एकर जागेमधून मोठ्या प्रमाणात दोन तीन महिन्यांपासून मुरुमाचे उत्खनन चालू आहे, वीस वीस फुटाचे खड्डे पडले आहे.वेळोवेळी तहसीलदार यांना निवेदन देखील दिले आहे उत्खनन करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पुण्यातून हे काम करत आहे,त्यातीलच एक म्होरक्या जामिनावर बाहेर असून त्याच्या नेतृत्त्वाखाली ही टोळी केडगावमध्ये काम करत आहे.

तरी तहसीलदार संजय शिंदे यांनी या जागेचा पंचनामा करून मार्केट कमिटीचे संचालक मंडळ , सचिव, फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी नगरसेवक अमोल येवले यांनी निवेदनातून केली, यावेळी शरद ठुबे, सोनू घेबुड, विजय सुंबे, अभिजीत कोतकर, दत्ता धोत्रे, तुकाराम कोतकर, मल्हारी आव्हाड, ओंकार कापडे, सुहास साबळे, संकेत वाघमारे, राहुल शिंदे, गणेश दिवटे, कार्तिक पितळे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटलंय की,अहिल्यानगर येथील नेप्ती उपबाजार समितीचा सर्व्हे नं.७२ मधुन अवैध रित्या मुरमाचे उत्खनन झाले असुन सदर मुरुम इतर ठिकाणी वापरण्यात आला असून सदर सर्व्हे नं.७२ मधुन गौणखनिज वाहतुक झाली असुन त्यासाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी स्वामित्व धन न भरता बांधकाम व रस्त्यांसाठी गौणखनिजाचा वापर झाला आहे.

त्याचप्रमाणे शासनाची फार मोठ्या प्रमाणात स्वामित्व धन (रॉयल्टी) चे नुकसान केले असुन झालेल्या उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. सदर वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मणक्याचा त्रास व हाडांच्या समस्या जाणवत आहेत.

सदर नेप्ती, ता.नगर, जि. अहिल्यानगर येथील सर्व्हे नं. ७२ हा नेप्ती उपबाजार समिती यांचे नावावर असुन सात बारा वर तशी नोंद आहे.त्यामुळे सदर उत्खननास नेप्ती उपबाजार समिती सुध्दा जबाबदार असुन समितीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, सभापती, सचिव यांचेवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत सदर उत्खननाचा महसुल यंत्रणे मार्फत पंचनामा करण्यात येऊन त्याबाबत व्याज व दंडासह वसुली करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.

Sushant Kulkarni