‘भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-कोणत्याही सेवेची प्राथमिकता शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणाच्या आधारे असावी. नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही.

कायदा आपले काम करू शकतो. आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत. आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत. कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा, असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होत नसतानाही कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह अन्य पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत.

अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी केलेल्या टिकेला शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘याला म्हणतात विशेषाधिकार’ असे म्हणत निशाणा साधला. तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषांप्रमाणे लसीचा डोस देण्यात आला याची मला कल्पना नाही.

हे नियांमांनुसार झाले असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु नियमांचे उल्लंघन करून जर झाले असेल तर ते अयोग्य आहे. नियमांनुसार पात्र नसल्याने माझ्या पत्नीला आणि मुलीलाही लस देण्यात आली नाही.

प्रत्येकाने नियमांचे पालन करावे हे माझे ठाम मत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. दरम्यान, तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही.

नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा फोटो सोमवारी सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला. रात्री इन्स्टाग्रामवरून तो फोटो हटवण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवले होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24