अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाने सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना शिर्डी मध्ये घडली आहे.
गंगाधर विश्वनाथ वरघुडे (वय 52) रा. शिर्डी असे या मुख्यधायपाकाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मुख्याध्यापका विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान हा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून व गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी शिक्षिकेला मुख्याध्यापकाने ॲसिड फेकून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या काही दिवसांपूर्वी शिर्डी शहरात असलेल्या एका नामांकित शैक्षणिक संस्थेत एका शिक्षिकेने आरोपी मुख्याध्यापक गंगाधर विश्वनाथ वरघुडे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.
त्यामुळे याचा राग मनात धरून व हा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी वरघुडे याने ही शिक्षिका दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कामावरून आपल्या घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहात असताना तीला थांबवून ‘माझ्या विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घे,
नाहीतर ऍसिड टाकून तुला जीवे मारून टाकीन, व तुझ्या घरच्यांना संपवून टाकीन’, अशी धमकी दिली. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेने शिर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी वरघुडेविरोधात गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.