Maruti S Presso : फक्त 40 हजार रुपयांमध्ये घरी न्या मारुतीची कार, मायलेज आणि फीचर्सही आहे जबरदस्त

Maruti S Presso : देशातील कार उत्पादक कंपन्यांपैकी मारुती सुझुकीचा मार्केटमध्ये चांगलाच दबदबा आहे, त्यामुळे या कंपनीच्या कार्सना बाजारात चांगली मागणी आहे.

मारुती सुझुकी ही प्रत्येक सेगमेंटमध्ये कार तयार करते. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या मारुती एस प्रेसो या कारवर जबरदस्त सवलत मिळत आहे. ही कार तुम्ही फक्त 40 हजार रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

किंमत

मारुती एस्प्रेसोचे बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत (दिल्ली) 4,25,000 रुपये इतकी आहे तर ऑन-रोड त्याची किंमत 6,64,792 रुपये इतकी आहे.

फायनान्स प्लॅन

या किंमतीनुसार, तुम्हाला ही SUV कॅश पेमेंट मोडमध्ये खरेदी करण्यासाठी 6.64 लाख रुपये मोजावे लागतील परंतु, तुम्ही प्लॅनद्वारे 40 हजार रुपये भरून ती खरेदी करू शकता.

जर तुमच्याकडे 40 हजार रुपये असतील तर ही कारच्या कर्जासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला बँक 4,24,792 रुपयांचे कर्ज देईल. कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या कारसाठी 40 हजार रुपये डाउन पेमेंटसाठी जमा करावे लागतील.

हे लक्षात घ्या की बँक कर्जाच्या एकूण रकमेवर वार्षिक 9.8% व्याज दर आकारेल त्याचबरोबर कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने निश्चित केलेल्या 5 वर्षांच्या कालावधीत तुम्हाला दरमहा 8,984 रुपये मासिक EMI जमा करावी लागणार आहे.

इंजिन आणि ट्रान्समिशन

या कारमध्ये कंपनीने 998 cc इंजिन दिले आहे जे 65.71 bhp पॉवर आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे.

मायलेज

मायलेजचा विचार केला तर यामध्ये 21,4 kmpl मायलेज आहे जे ARAI द्वारे प्रमाणित आहे. ही कार मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हील, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7 इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज यांसारख्या फीचर्ससह 5 सीटर मायक्रो एसयूव्ही आहे.