बदल्यात कमावलेला पैसा बाहेर काढून कोविड सेंटरवर खर्च करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- रेमडिसिव्हीर मिळत नसताना मी विमानाद्वारे 15 लाख खर्चून 2000 इंजेक्शन आणले नगर सिव्हिल, साईबाबा संस्थान रुग्णालयात तसेच रूग्णांना पोहोचवले ते ही राज्यात आमची सत्ता नसताना, मंत्रिपद नसताना मग रेमडीसीविर मिळत नाही असं ओरडत बसण्याऐवजी बदल्यात कमावलेला पैसा बाहेर काढून कोविड सेंटरवर खर्च करा.

असा टोला खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना विशेषतः नामदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला. पुढे बोलताना विखे म्हणाले कि, सुजय विखे म्हणाले की रेमडीसिवर इंजेक्शनशी भाजपाचा कोणताही संबंध नाही.

विखे पाटील घराण्याचे काही उद्योगपतीशी संबध आहेत. आमच्या कॉलेजमध्ये शिकून काहींनी कंपन्या टाकल्या. त्यामुळे विमानाने दोन हजार रेमडीसिवर इंजेक्शन आणली आणि रुग्णांना दिली. डॉक्टरांनी गरज असेल तरच रेमडीसिवर इंजेक्शन द्यावे.

विनाकारण रेमडीसिवर इंजेक्शन देऊ नये. तसेच यावेळी बोलताना विखे म्हणाले कि, जिल्ह्यात अनेकांनी कोविड सेंटर सुरू केले पण शासकीय मदत घेतली पण बाळासाहेब नाहटा यांनी पुढे येऊन यांनी स्वखर्चाने सेंटर सुरू केले ते कौतुकास्पद आहे.

जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी नाहटा यांचा आदर्श घ्यावा. इतर सेंटरला ऑक्सिजनसिलेंडर अडचण असताना नाहटा यांना अडचण येत नाही ते इतर सेंटरला देखील सिलेंडर पुरवतात याचेही कौतुक केले

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24