अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- कोरोनावर औषध नव्हते, तोपर्यंत संपूर्ण जगाला चिंतेने ग्रासले होते. मात्र आता आलेल्या कोरोना लसीमुळे आता हद्दपार होईलच, पण लसीकरणामुळे इतर आजारांपासून सुटका मिळत असल्याचा दावा लस घेतलेल्या नागरिकांनी केला आहे.
ज्या ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्यांना लस घेण्याच्या अगोदर जे इतर त्रास होते ते कमी झाले असल्याचा दावा त्या लोकांनी केला आहे.
यासंदर्भात इंग्लंडमधील एका वर्तमानपत्राने लस घेतलेली लोकांचे अनुभव प्रकाशित केले आहेत. कोरोना लस घेतल्यामुळे त्यांना पूर्वीपेक्षा अधिक फिट आणि फ्रेश वाटत असल्याचा या नागरिकांनी केला आहे. लस घेतल्यानंतर अनुभव सांगताना एक महिला म्हणाली की, तिला बऱ्याच वर्षापासून अंग खाजवण्याची समस्या होती.
लस घेतल्यानंतर त्यात बदल झाला आहे. तर आपल्या पतीला पंधरा वर्षापासून झोपेचा त्रास होता. हा विकार आता गायब झाल्याचे त्या महिलेचे म्हणणे आहे. मॅंचेस्टर येथील 72 वर्षीय महिलेचे गेल्या वर्षी गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. मात्र इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्या महिलेला चालताना खूप त्रास होत होता.
त्यामुळे तिने चालणे बंद केले होते. पण, ऍस्ट्राजेनेकाची लस घेऊन आल्यानंतर गुडघेदुखीचा त्रास दुसऱ्या दिवशी पूर्ण नाहीसा झाला. सांधेदुखी पूर्ण गायब झाली असल्याचा दावा तिने केला आहे. पाय जवळ घ्यायलाही कष्ट पडत असलेल्या ती महिला आता कामावर जाण्याच्या तयारीत आहे.
एका डॉक्टरांनीही आपल्याला थकव्याचा खूप त्रास जाणवायचा. पण लस घेतल्यानंतर आता फ्रेश वाटत असल्याचे म्हटले आहे.
तर एका महिलेला 25 वर्षांपासून व्हर्टीगोची समस्या होती. लसीकरणानंतर ती गायबच झाली असल्याचा तिचा दावा आहे. एखाद्या लसीनंतर अन्य त्रास कमी होण्याचा अथवा गायब होण्याचा हा काही पहिला अनुभव नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.