Room Heater Tips : राज्यभरात थंडीचा हंगाम सुरु झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे अनेकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे अनेकजण थंडीपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत आहेत.
अनेकजण रूम हीटर विकत घेतात. जर तुम्हीही रूम हीटर खरेदी करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
रूम हीटर खरेदी करत असताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. कारण अनेकदा आपण स्वस्त वस्तूंच्या नादात महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष देतो. त्यामुळे पैशांकडे पाहून असे हिटर विकत घेतो यामध्ये मोठ्या प्रमाणात वीज लागते. त्यामुळे हिटर विकत घेत असताना पुढील गोष्टींचा विचार करावा.
1. पोर्टेबल हीटर
जर तुम्हाला वारंवार हीटर फिरवावा लागणार असेल, तर तुमच्यासाठी पोर्टेबल हीटर हा उत्तम पर्याय आहे.
2. तापमान नियंत्रित करणारा हीटर
जर तुम्ही 100 चौरस फूट आकाराच्या खोलीसाठी हिटर घेत असाल तर तुम्ही 750W चा हीटर विकत घ्यावा. कारण यामुळे खोली खूप लवकर गरम होते.
3. फॅन आधारित हीटर
जर तुमच्या घरात कमी पंखे असतील तर तुमच्यासाठी फॅन आधारित हीटर हा उत्तम पर्याय आहे. या हिटरला कमी वीज लागते त्यामुळे खोली त्वरित गरम होते.
4. 4 किंवा 5 स्टार हीटर
आणखी एक म्हणजे हीटर खरेदी करत असताना स्टार रेटिंगकडे लक्ष द्या. कधीही 3 पेक्षा कमी रेटिंग असलेले हीटर खरेदी करू नये.
जर तुम्ही रूम हीटर विकत घेणार असाल तर वरील गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही आर्थिक संकटात सापडू सापडण्याची दाट शक्यता आहे.