अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- घरात कोणीही नसतांना घरात शिरुन मोबाईल चोरणारा आरोपी गणेश दिवाणजी काळे (रा. वाकोडी फाटा, नगर) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, या चोरीच्या घटनेबाबत फिर्यादी रणजितसिंग छोटेलाल यादव (वय ५४ वर्षे धंदा नोकरी रा. वाकोडी फाटा, नगर) यांनी माझ्या घराचा दरवाजा उघडा ठेवून बाहेर गेलो असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने माझ्या परवानगीविना माझ्या राहत्या घरातून दोन माझे मोबाईल चोरुन घेवून गेले आहेत.
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरून दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने याचा शोध सुरु केला. गुप्त बातमीद्वारामार्फत पोलिसांना माहिती समजली कि,
सदरचा गुन्हा हा गणेश दिवाणजी काळे (रा. वाकोडी फाटा, नगर) यांनी केला असून तो सध्या वाकोडी फाटा येथे आलेला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.