Gold Loan : गोल्ड लोन काढताना अनेक गोष्टीचा विचार करून ते काढले जाते. कारण कोणती बँक कमी व्याजदर आकारात आहे. तसेच कुठे फायदा आणि तोटा आहे हे देखील पहिले जाते. पैशाची गरज असल्यानंतर अनेकजण सोने गहाण ठेऊन कर्ज घेत असतात.
मात्र गोल्ड लोन घेत असताना अनेक बँकांचे नियम वेगवेगळे आहेत. तसेच प्रत्येक बँकेचा व्याजदर हा देखील वेगळा आहे. त्यामुळे सर्वात कमी व्याजदर आकारणारी बँक ही तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
अनेकजण आजकाल सोने तारण ठेऊन कर्ज घेत आहेत. जोपर्यंत बँकेकडून घेतलेली रक्कम पुन्हा करत नाही तोपर्यंत ते सोने बँकेकडे गहाण ठेवले जाते. दिलेल्या कर्जावर बँकेकडून व्याज आकारले जाते.
प्रत्येकजण वेगवेगळ्या आर्थिक कारणासाठी गोल्ड लोन काढत असतो. प्रत्येक बँकेनुसार व्याजदर बदलत असतो. तसेच प्रत्येकाला बँक निवडून गोल्ड लोन घेण्याचा अधिकार आहे.
सर्वात कमी व्याजदर घेणाऱ्या १० बँक
या गोष्टी लक्षात ठेवा
तुमच्या गोल्ड लोनला उशीर किंवा न भरल्याने गहाण ठेवलेले तुमचे सोने संपुष्टात येते. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर लक्षणीयरीत्या कमी होतो. गोल्ड लोनचे अनेक फायदे आहेत आणि यासाठी अर्ज करणे सोपे आहे, परंतु तुम्ही याची पूर्ण आणि वेळेवर परतफेड केली पाहिजे.
अनेक स्मरणपत्रांनंतरही तुम्ही कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास, कर्जाचा तोटा वसूल करण्यासाठी किंवा शिल्लक ठेवण्यासाठी कर्जदात्याला तुमच्या सोन्याचा लिलाव करावा लागेल. सामान्यतः लिलावाच्या दोन आठवड्यांपूर्वी, लिलावाच्या तारखेच्या दोन आठवडे आधी सावकार तुम्हाला त्याच्या लिलावाबद्दल सूचित करेल.