Car Insurance : अनेकजण नवीन किंवा जुनी कार खरेदी करतात. आता नवीन वर्षात अनेक दिग्गज कंपन्या आपल्या कार्सच्या किमतीत वाढ करणार आहेत. कार खरेदी केल्यानंतर तिचा इन्शुरन्स काढायला विसरू नका.
कारण इन्शुरन्स आपल्यासाठी आणि आपल्या कारसाठी खूप फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर कारचा इन्शुरन्स काढत असताना काही गोस्तही लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे, नाहीतर आपली फसवणूक होऊ शकते.
1. फरक समजून घेणे गरजेचे
विमा प्रामुख्याने दोन प्रकारांत विभागला जातो. एक म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि दूसरा म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स. अपघाताच्या वेळी समोरच्या व्यक्तीचे, त्याच्या वाहनाचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले तर तो थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर करतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्समध्ये तुमचे वाहन आणि तुम्हाला कव्हर केले जाते.
2. IDV तपासणे गरजेचे
विमा पॉलिसीमध्ये नमूद केलेले IDV तपासा. याचा अर्थ असा की, कार चोरीला गेली किंवा पूर्णपणे खराब झाली तर तुम्हाला दिलेली रक्कम ती असते.
3. प्रीमियरचा दर तपासा
कोणतीही कार पॉलिसी घेण्यापूर्वी सर्वात अगोदर तिचा प्रीमियम दर समजून घ्या. जर तुम्ही खूप स्वस्तात विमा घेत असाल तर त्यात सुविधा कमी असतात.
4. क्लेम सेटलमेंट रेशो पहा
तुम्ही ज्या कंपनीचा विमा घेत आहात त्यांनी एका वर्षात किती दावे सेटल केले आहेत ते क्लेम सेटलमेंट रेशो हे सांगते, जर हे प्रमाण चांगले असेल तरच तुम्ही त्या कंपनीकडून विमा घ्या.
5. तुलना
विमा पॉलिसी फायनल करण्यापूर्वी एकदा इतर पॉलिसींशी त्याची तुलना करा. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्हाला तुलना पाहायला मिळू शकते. एकाच वेळी सर्व विमा पॉलिसींच्या प्रीमियम, IDV आणि इतर फीचरची तुलना करा. त्यानंतरच विमा पॉलिसी निवडा.