अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज ते देऊळगाव येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने कारवाईसाठी गेलेले तलाठी सचिन प्रभाकर बळी व होमगार्ड अक्षय काळे यांना वाळू तस्करांकडून धक्काबुक्की करण्यात आले असल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वाळू तस्करी बाबत माहिती समजताच तलाठी बळी व होमगार्ड काळे हे घटनास्थळाकडे गेले.
मात्र वाळू तस्कर महसूलचे अधिकारी येत असल्याची चाहूल लागताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तलाठी व होमगार्ड यांनी वाळूचा एक ट्रक पकडला.
ट्रक व त्यामधील मुद्देमाल असा एकूण 5,26000/-रु. मुद्देमाल यांनी पकडला होता. त्यातील एकात होमगार्ड काळे यास बसवून ट्रक तहसीलदार कार्यालयात नेण्यास सांगितले असता
ड्रायव्हर-अक्षय सुनिल डाळिंबे तसेच ट्रक मालक यांनी फिर्यादी व साक्षीदार होमगार्ड यांना शिवीगाळी दमदाटी करुन धक्काबुक्की करत गाडीमधुन खाली उतरण्यास भाग पाडले.
त्यानंतर तस्कर गाडी घेऊन पसार झाले पर्यायी तलाठी सचिन प्रभाकर बळी यांना मोकळ्या हाताने परत यावे लागले. त्यानंतर तलाठी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संबंधित वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.