ताज्या बातम्या

Talathi Bharti 2023: तलाठी होण्याची सुवर्णसंधी! राज्यात 4685 तलाठी रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, वाचा महत्त्वाची माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

कोरोना कालावधीपासून राज्यामध्ये सर्व विभागांच्या भरती प्रक्रिया या थांबवण्यात आलेल्या होत्या. परंतु आता अनेक विभागांच्या भरती प्रक्रिया राबवल्या जात असून काही भरतीसाठीच्या जाहिराती देखील काढण्यात आलेले आहेत.

यामध्ये जर आपण तलाठी भरतीचा विचार केला तर उमेदवारांना बऱ्याच दिवसांपासून तलाठी भरतीचे वेध लागलेले होते. अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण आणि तरुणी चातकासारखी या भरतीची वाट पाहत होते.

त्यामुळे आता अशा तरुण आणि तरुणीची प्रतीक्षा संपली असून तलाठी भरती प्रक्रियेला आता वेग येणार असून यासंबंधीची प्रारूप जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे राज्यामध्ये तब्बल 4664 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यासाठी अर्ज प्रक्रिया देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

अशा पद्धतीचे राहणार स्वरूप

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राज्यामध्ये 4664 तलाठीच्या रिक्त पदांसाठी पदभरती होणार असून यासाठीची अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहे. राज्यामध्ये तलाठी गट क संवर्गातील जी काही रिक्त पदे आहेत.

ही सर्व पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने आता मान्यता दिल्यामुळे आणि या भरती करिता सरकारने शिथिलता आणली असून भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून लवकरच तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व विभागातील जे जिल्हे आहेत त्यातील तलाठ्यांच्या 4664 पदे भरण्यासाठी आता ही परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जर आपण काही जिल्ह्यांचा विचार केला तर या ठिकाणी आदिवासी लोकसंख्या जास्त असल्यामुळे अशा ठिकाणी आदिवासी समाजाच्या तरुण आणि तरुणींना तलाठी भरतीमध्ये संधी मिळावी याकरिता पेसा नियमानुसार जागा देखील आरक्षित करण्यात येणार आहेत.

ही भरती प्रक्रिया भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून राबवली जाणार असून याकरिता भूमी अभिलेख विभागाने टीसीएस या कंपनीची निवड केली असून कंपनीकडून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर हे दोन तारखांना परीक्षा घेण्याचे पर्याय देण्यात आले आहेत व तसेच सरकारला देखील कळविण्यात आले.

या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्याकरिता स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढणे शक्य नसल्यामुळे संपूर्ण राज्याकरिता एकच प्रश्नपत्रिका काढली जाण्याची शक्यता आहे. लवकरच परीक्षेचा अर्ज नोंदणीसाठी लिंक खुली करण्यात येणार असून लिंक ओपन झाल्यानंतर 21 दिवसांची मुदत ही अर्ज करण्यासाठी देण्यात येणार आहे. एका जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अर्ज भरता येणार आहे.

अर्ज करताना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

या भरती करता शाळा सोडल्याचा दाखला (दहावी व बारावी तसेच पदवी), दहावी आणि बारावीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट, पदवी प्रमाणपत्र, पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन केले असेल तर त्याचे प्रमाणपत्र, तसेच एनएसएस किंवा एनसीसी प्रमाणपत्रे( केले असेल तर), महाराष्ट्राचा रहिवासी दाखला अर्थात वय अधिवास सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, जातीचा दाखला, जात वैधता अर्थात कास्ट व्हॅलिडीटी प्रमाणपत्र, ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र( आवश्यकता असेल तेथे), महिला आरक्षण प्रमाणपत्र( महिलांना लागू असल्यास)

विभागाचे नाव आणि रिक्त पदे
1- कोकण विभाग – 550 रिक्त पदे
2- नासिक विभाग- 689 रिक्त पदे
3- पुणे विभाग-602 रिक्त पदे
4- औरंगाबाद विभाग – 685 रिक्त पदे
5- नागपूर विभाग- 478 रिक्त पदे
6- अमरावती विभाग- 106 रिक्त पदे

Ahmednagarlive24 Office