अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- महाड तालुक्यातील तळीये हे गाव वसविण्याची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी कोणालाही अडचण भासू देणार नाही,
हा दिलेला शब्द पूर्ण करण्याची ही सुरुवात आहे. ही सूचना मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा :- गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात पावासाने हाहा:कार माजवला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारासह राज्यात पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालं आहे.
चिपळूण, सांगली आणि कोल्हापूरसारख्या अनेक भागात सध्या पूरग्रस्त स्थिती आहे. रायगड जिल्ह्यातील तळीयेसारख्या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आणि इतर दुर्घटनामुळे राज्यात 80 पेक्षा जास्त जणांना जीव गमावाला लागला आहे.
अनेक जण मलब्याखाली गाढले गेलेत तर शेकडो जण बेपत्ता आहेत. गाई-जनावारांसह पिकांचंही नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी महाड येथे भेट दिली. या वेळी त्यांनी रायगड, रत्नागिरीसह राज्यातील इतर पुरग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना मदतीची घोषणा केली आहे.
रायगड, रत्नागिरीसाठी प्रत्येकी दोन कोटी :- तळीये गाव वसवण्याची जबाबदारी ‘म्हाडा’ने उचलली आहे. आव्हाड यांनी याबाबतची घोषणा केली आहे. याबाबतचं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड तालुक्यातील तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर गंभीर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड व रत्नागिरीसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.