‘तालुक्याची बदनामी करणारे अधिकारी तालुक्याला नको’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यासंबंधीच्या बातमी टीव्हीवर पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याशी बोललो आहे. अशा गोष्टींमुळे तालुक्याची बदनामी होत आहे.

त्यामुळे असे अधिकारी तालुक्याला नको आहेत. वेळ पडली तरी मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करील असे हजारे म्हणाले. पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.

त्यामुळे तालुक्यासह राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यात पारनेरचे आमदार निलेश लंके व महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके यांनी काल सकाळी राळेगणसिद्धीत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.

यावेळी दोघांमध्ये जवळपास १ तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. यावेळी आमदार लंके यांनी हजारे यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांना सादर केलेल्या अहवालाची प्रत दाखवत सविस्तर चर्चा केली.

तहसिलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यात काम करत असताना सामान्य जनतेची पिळवणूक करत कसा भ्रष्टाचार केला याचीही माहिती दिली.

तसेच इतर जिल्ह्यांमध्ये तहसिलदार म्हणून काम करताना त्यांचे काम कसे होते याबाबतची माहिती लंके यांनी यावेळी हजारे यांना दिली. यामुळे आता तहसीलदार देवरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24