अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. तसेचज नुकतेच केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. यामुळे राज्यात पावसाचा इशारा देणयात आला होता.
आता याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.
या पावसाने बळीराजा मात्र सुखावला आहे. यामुळे पेरणीची कामे जोरात सुरु होणार असे चित्र सध्या जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पर्जन्यमान कसे झाले याची आकडेवारी आपण पाहू. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ७०.१, शेवगाव तालुक्यात ६५.१, कर्जत तालुक्यात ५५.१ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यांमध्ये आतापर्यंत झालेला पाऊस मि.मी.(सरासरी) पुढीलप्रमाणे आहे.
अहमदनगर ३७.६, पारनेर ४९.४, श्रीगोदा ७०.१, कर्जत ५५.१, जामखेड २०.६, शेवगाव ६५.१, पाथर्डी ४९.१, नेवासा १७.३, राहुरी १२.०, संगमनेर २५.९, अकोले ५५.१, कोपरगाव ४६.१, श्रीरामपूर १३.५, राहता २८.०, असा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यांमध्ये सरासरी झालेला एकूण पाऊस ३९.५ मिलिमीटर इतका आहे, असे जिल्हा प्रशासनाने पत्रकात म्हटले आहे.