ताज्या बातम्या

तमाशा कलावंतांनी केली सरकारकडे ‘ही’ मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  सध्या देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सरकारने आता सर्वच क्षेत्र सामान्यांसाठी खुली केली आहे. मात्र राज्यातील कलावंताच्या कार्यक्रमांना सरकारने अद्याप परवानगी दिली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे सरकारने आता कलावंतांच्या तमाशाला परवानगी द्यावी. असे आवाहन महाराष्ट्र राज्य तमाशा मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी केली आहे.

याबाबत पत्रकात खेडकर यांनी म्हटले, की कोरोना महामारीत प्रत्येक क्षेत्राला त्याच्या विघातक परीणामांना सामोरे जावे लागले. सांस्कृतिक पाया भक्कम असलेल्या राज्याच्या विविध सांस्कृतिक क्षेत्रावरदेखील याचा मोठा परिणाम झाला. लोक कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असताना सरकारनेदेखील सर्वच क्षेत्रावरील आपले निर्बंध हटविले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात काम करणारे लोकदेखील आपल्या कामावर परतले आहेत.

अशा स्थितीत महाराष्ट्रातील कलावंतांच्या कार्यक्रमांना सरकारने अद्यापही परवानगी दिलेली नाही. सरकारने सांस्कृतीक कार्यक्रमांना परवानगी दिली असली तरी तमाशा मंडळाना अद्याप परवानगी दिलेली नाही.

सरकार ही परवानगी का नाकारत आहे. आज राज्यात किर्तन, राजकीय सभा पार पडत असताना सरकार मात्र तमाशाला परवानगी देत नाही.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासुन या लोकांची उपासमार सुरु आहे. सरकारने आतातरी तमाशासंदर्भात थोडीशी आपुलकी दाखवुन तमाशा फड सुरु करण्याची परवानगी द्यावी विनंती केली आहे.

Ahmednagarlive24 Office