Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Tata Altroz ​​iCNG Car : शानदार मायलेज आणि ड्युअल सिलेंडरसह टाटाची नवीन सीएनजी कार लॉन्च, किंमत आहे…

Tata Altroz ​​iCNG Car : सर्वात आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपली नवीन सीएनजी कार लॉन्च केली आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून कंपनी या नवीन सीएनजीवर काम करत होती. अखेर कंपनीची बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित कार लाँच करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनीची आगामी कार Tata Altroz ​​iCNG मध्ये ड्युअल सिलेंडर दिला जाणार आहे. तसेच या कारमध्ये कंपनीकडून शानदार फीचर्स आणि स्टायलिश लूक दिला गेला आहे. मायलेजचा विचार केला तर यात 25 ते 30 किमी मायलेज मिळणार आहे.

चार प्रकारांत झाली लॉन्च

कंपनीची आगामी कार XE, XM+, XZ आणि XZ+S या चार प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. तसेच या कारच्या टॉप मॉडेलमध्ये सनरूफही दिले आहे.

मिळणार उत्कृष्ट फीचर्स

कंपनीच्या या कारमध्ये तुम्हाला उत्कृष्ट फीचर्स दिसणार आहेत. यात नवीनतम स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, रिअर पार्किंग कॅमेरा, रेन सेन्सिंग वायपर्स, लेदरट अपहोल्स्ट्री, क्रूझ कंट्रोल तसेच अॅम्बियंट मूड लाइटिंग, आयसोफिक्स चाइल्ड माउंट अँकरेज आणि ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज यांसारखे शानदार फीचर्स देण्यात आले आहे.

जाणून घ्या किंमत

जर किमतीचा विचार केला तर कंपनीकडून या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.55 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 10.55 लाख रुपये असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला सर्वोत्तम कार घ्यायची असल्यास टाटाची ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय असेल. इतकेच नाही तर कंपनीशी निगडित असणारी बँक ही कार खरेदी करण्यासाठी जबरदस्त फायनान्स प्लॅन देईल.