Tata Nano EV : टाटा नॅनो इलेक्ट्रिक अवतारात मार्केटमध्ये येणार का ? जाणून घ्या खरी माहिती

Tata Nano EV : देशात आता इलेक्ट्रिक कार्सचा क्रेझ झपाट्याने वाढत आहे. अनेक कंपन्या आपल्या लोकप्रिय कार्सना इलेक्ट्रिक अवतारात लाँच करत आहे. यातच आता देशातील लोकप्रिय कंपनी टाटा देखील मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

समोर आलेल्या माहितीनुसार टाटा लवकरच देशात सर्वाधिक लोकप्रिय झालेली कार Tata Nano ला पुन्हा एकदा मार्केटमध्ये लाँच करू शकतो ते पण इलेक्ट्रिक अवतारात अशी जोरदार चर्चा सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये सुरु आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो आतापर्यंत कंपनीकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, परंतु लीक आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबतची माहिती मिळत आहे.

Advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह नॅनो पुन्हा सादर करण्याच्या तयारीत आहे. ही नॅनो ईव्ही भारतात आली तर त्याची किंमत तर कमी होईलच पण रेंजही जास्त असेल. म्हणजेच जे लोक परवडणारी इलेक्ट्रिक कार घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांचे स्वप्न पुन्हा एकदा टाटा मोटर्स पूर्ण करणार आहे.

टाटा नॅनोच्या डिझाईनपासून त्याच्या रेंजपर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र डिझाइनच्या बाबतीत तिची ओळख कायम ठेवता येईल अशी अपेक्षा आहे. त्याची किंमत कमी असेल जेणेकरून अधिकाधिक लोक ते खरेदी करू शकतील. त्यात बसवलेल्या बॅटरी पॅकची कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही. मात्र लवकरच या सर्व गोष्टी उघड होणार असल्याची चर्चा आहे.

Advertisement

हे पण वाचा :- Post Office Scheme: विवाहितांसाठी सुपरहिट योजना ! आता दरमहा कमवता येणार 5 हजार रुपये ; जाणून घ्या कसा होणार फायदा