Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Tata Upcoming Car : शानदार मायलेजसह लवकरच मार्केटमध्ये लाँच होणार नवीन टाटा हॅरियर, एमजी हेक्टरला देणार टक्कर!

जर तुम्ही नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर लगेच घाई करू नका. कारण टाटा आपली शक्तिशाली कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Tata Upcoming Car : भारतीय कार बाजारात अनेक कंपन्या आपल्या जबरदस्त फीचर्स असणाऱ्या कार लाँच करत आहेत. सर्वच कंपन्या आपल्या आगामी कारमध्ये शानदार मायलेज देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कार खरेदी करणे आता महाग झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण सर्व कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागत आहेत. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता बाजारात टाटा हॅरियर फेसलिफ्ट लाँच होणार आहे. ही कार एमजी हेक्टरला टक्कर देईल.

जाणून घ्या टाटा हॅरियर फेसलिफ्ट फीचर्स

ग्राहकांना आता नवीन टाटा हॅरियर फेसलिफ्टमध्ये जबरदस्त फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यात कंपनीची 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, फॉरवर्ड कोलिजन अलर्ट, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, नवीन 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल तसेच प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, लेन चेंज असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग यासारखी भन्नाट फीचर्स देण्यात येत आहेत.

पॉवरट्रेन

कंपनी आपल्या आगामी कारमध्ये 2.0 लीटर, 4 सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारचे इंजिन 170 Bhp पीक पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असणार आहे. इतकेच नाही तर यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही देण्यात येणार आहे.

किती असणार किंमत

जर किमतीबद्दल विचार करायचा झाला तर कंपनीकडून सध्या या कारच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु असे मानले जात आहे की कंपनी आपल्या आगामी कारला भारतीय बाजारात 14 ते 17 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करेल. या कारचा लूक स्टायलिश असेल.