Tax Saving : प्रत्येक नोकरदार वर्गासाठी नवीन आर्थिक वर्षाचा पहिला महिना म्हणजे एप्रिल महिना खूप महत्त्वाचा असतो. वास्तविक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीला त्यांच्या प्रस्तावित गुंतवणुकीची माहिती देणे गरजेची असते. यासह वेतनवाढीचा हंगामही सुरू होतो. उच्च वेतन वाढ ही नेहमीच चांगली बातमी असते, परंतु त्यामुळे कर वाढत असतो.
जगभरातील जवळपास सर्वच देशांत ज्या लोकांचं उत्पन्न विहित मर्यादेहुन अधिक आहे, त्यांना सरकारला टॅक्स म्हणजेच कर देणे गरजेचे असते. जर तुम्ही टॅक्स भरला नाही तर तुम्हाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल. जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.
गृहकर्ज- समजा जर तुम्ही गृहकर्ज घेतले असल्यास तर आता त्यावरही तुम्हाला कर बचत करता येईल. हे लक्षात ठेवा की गृहकर्ज हा कर बचतीचा एक महत्त्वाचा मार्ग असून गृहकर्ज घेतल्यानंतर मूळ रक्कम आणि व्याजावर कर बचत करता येईल.
वैद्यकीय विमा- सध्याच्या काळात अनेकजण वैद्यकीय विमा घेत असतात. वैद्यकीय विम्याद्वारे तुम्हाला मोठ्या प्रमाणात कर वाचवता येईल. जर लोकांनी स्वतःसाठी किंवा त्यांच्या पालकांसाठी वैद्यकीय विमा काढल्यास तर आयटीआर भरत असताना त्यावर कर वाचवता येऊ शकतो.
80C- आयकर कायद्याद्वारे 80C अंतर्गत कर वाचवता येईल. याअंतर्गत एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांचा कर देखील वाचवता येऊ शकतो. जीवन विमा प्रीमियम, NPS, PPF, PF, ELSS इत्यादीद्वारे तुम्हाला 80C अंतर्गत कर बचत करता येते.येईल.
शैक्षणिक कर्ज- सध्याच्या काळात शैक्षणिक कर्जाचा कल खूप वाढत चालला आहे. समजा एखाद्याने शैक्षणिक कर्ज घेतले असल्यास तर त्यावर कर वाचवता येऊ शकतो. आयटीआर भरत असताना शैक्षणिक कर्जाअंतर्गत 80E अंतर्गत कर बचत करता येईल.