ताज्या बातम्या

पॅन्ट शिवण्यासाठी गेलेल्या टेलरने ग्राहकाच्या पोटातच कात्री खुपसली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra News :- पुणे शहरातील चंदननगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच शिवण कामासाठी वापरली जाणारा कात्री खुपसली आहे.

कपडे अल्टर करण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या पोटात कात्री खुपसली. अजय प्रभाकर पायाळ (24 वडगाव शेरी ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी हा मुज्जमिल टेलर शॉप येथे काम करतो.

पीडित तरुण व त्याचा मित्र त्यांच्याकडे पँट अल्टर करण्यासाठी दुकानात गेले . तिथे त्यांनी पॅन्ट अल्टर करून घेतली. त्यानंतर पीडित ग्राहक व आरोपी यांच्यात पैसे देण्यावरून वाद निर्माण झाला.

यातून दोघांमध्ये वादावादी झाली. यामध्ये चिडलेल्या आरोपीने पीडित तरुणाला स्टूल फेकून मारला व रागाने कात्री त्याच्या पोटात खुपसली अशी तक्रार पीडित तरुणाने दिली आहे. या घटनेचा अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

Ahmednagarlive24 Office