अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-  भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, असे सांगतानाच “अगोदर तुमच्या नवऱ्याला नितीमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा” अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली.

आ. निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते.

चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं. अहो तुमची महाराष्ट्राला ओळख आहे.

अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली. महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय?, राष्ट्रवादी पक्षच महिलांचा आदर करणारा पक्ष आहे.

आधी आपल्या घरात नीतिमत्ता शिकवा”, असा पलटवार त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला.पूर्वी लोक कोणाला खल्लास करायचं असेल तर डाकूला सुपाऱ्या द्यायचे. मात्र आता सुपारीची नवीन पद्धत निघाली आहे. एखाद्या चांगल्या माणसाला बदनाम करायची सुपारी दिली जाते.

तुमचं प्रकरण विचित्र पध्दतीने लोकांसमोर मांडल गेलं असून माझ्यावरही असेच आरोप झाले. तुमच्या वेळी मुंबईवरुन ज्या धावून आल्या, त्या सकाळ संध्याकाळ माझं नाव घेतात”, असा टोला मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना लगावला.