लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर केला अत्याचार!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- न्यायालयामध्ये काम करत असलेल्या एकाने लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात रवींद्र राजेंद्र सोनवणे (वय ३१ रा. तपोवन रोड, नगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने कालच सोनवणे याला राहाता येथून अटक केली फिर्यादी आष्टी तालुक्यात (जि. बीड) शिक्षिका म्हणून नोकरीला असून त्या नगरमध्ये राहतात. त्यांची काही दिवसांपूर्वी आरोपी सोनवणे सोबत ओळख झाली होती.

फिर्यादीने पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी लग्नही केले मात्र फिर्यादी यांनी सोनवणेकडे कायदेशीर पद्धतीने लग्न करण्याची अट घातली. दरम्यानच्या काळात सोनवणे याने त्याच्या आई वडिलांना माहिती दिली. सोनवणे याच्या आई वडिलांनी फिर्यादी शिक्षिकेला मारहाण केली.

आरोपी सोनवणे याने फिर्यादी शिक्षिकेस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत शिक्षेकेने आरोपी सोनवणे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24