शिक्षक बँक ताळेबंदातच महाघोटाळा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-प्राथमिक शिक्षक बँकेत अनेक घोटाळे करुण थकलेल्या महाभागी सत्ताधारी मंडळांनी शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सभा अहवालाच्या ताळेबंदातच आता महाघोटाळा केला आहे.

एक तर आपणाला प्रशासनाने अहवालच पाठविला नाही तो का पाठविला नाही याचे उत्तर आज शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाला सापडले आहे. जिल्हयातील १२ हजार सभासंदांना सत्ताधाऱ्यांनी वेडे समजले आहे.

असा घणाघाती आरोप जिल्हा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे व गुरुमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे केला आहे. शिक्षक बँकेत घड्याळ खरेदी घोटाळा, कर्मचारी फरक घोटाळा,

शौचालय घोटाळा, सावित्रीच्या लेकी घोटाळा आणि इतर अनेक घोटाळ्याच्या मालिकेत तब्बल २३ कोटी ९१ लक्ष ९ हजार रुपयांचा घोटाळा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालावरून समोर आलेला आहे.

इतिहासात प्रथमच सत्ताधारी संचालक मंडळाने सदर वार्षिक अहवालात वर्षाच्या जमा खर्चाचा व पुढील अंदाजपत्रकाचा समावेश असतो.या वर्षीच्या बँकेचा अहवाल सुस्त, बेजबाबदार प्रशासन आणि भ्रष्ट ,

सत्तापिपासू संचालक मंडळाने सन २०२०-२०२१ सालासाठी तयार केलेल्या खर्चाच्या व उत्पन्नाच्या आकडेवारीत तब्बल २३ कोटी ९१ लक्ष ९ हजार रुपयांचा घोटाळा केला आहे. सन२०२०-२०२१ अंदाज पत्रकात बँकेचे एकूण उत्पन्न १०३,६३,८८,८५० रुपये दर्शविले आहे

व खर्चाचे अंदाजपत्रक सादर करताना सन२०२०-२०२१ सालासाठी अंदाजे खर्चाची बेरीज ७९,७२,७९,८५० रु. एव्हडी आहे. उत्पन्न व खर्चाच्या अंदाजपत्रकात २३ कोटी ९१ लक्ष ९ हजार रुपये इतकी मोठी तफावत आहे.

एवढ्या मोठ्या रकमेचा खर्च कशासाठी करणार हा प्रश्न सभासदांसमोर उभा आहे. जोपर्यंत २०२०-२०२१ सालासाठी तयार केलेल्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक याचा ताळमेळ बसत नाही. सभासदांच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या या प्रकाराचा आम्ही निषेध करत आहोत. ठुबे व गुरुमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी नमूद केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24