अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- जिल्हा परिषदेचे नुतन माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचे स्वागत करुन, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी दिले.

यावेळी बबन शिंदे, वैभव शिंदे, निलेश बांगर, श्रीराम खाडे, मुख्याध्यापक संघटनेचे सहसचिव जमीर शेख, शिक्षकेत्तर संघटनेचे राज मोहंम्मद पठाण, तौसीफ शेख, दीपक कराळे, सुखदेव नागरे, रखमा दरेकर, सत्यवान कांबळे, सतीश वाणी,

अनिल जाधव, असिफ शेख, किशोर बरकडे, सत्यदान कांबळे, नासिर शेख, रियाज शेख आदी. बाबासाहेब बोडखे यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यां समोर असलेले विविध प्रश्‍न नुतन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या समोर मांडले. तर सदर प्रश्‍नांची सकारात्मक पध्दतीने सोडवणुक होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सर्व शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला व्हावे, सर्व शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले तात्काळ सादर करावी, सर्व कर्मचार्‍यांचे फरक बिले तात्काळ अदा करावे, सेवानिवृत्त शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीचे रक्कम आणि शिक्षकांचे ना परतावा भविष्य निर्वाह निधीचे प्रकरणे तात्काळ मिळावेत,

20 व 40 टक्के टप्पा अनुदानातील सर्व शाळांची बिले नियमित अदा करावीत, ज्या शिक्षक-शिक्षकेतर बंधू भगिनींचे कोरोनामुळे, अपघाताने किंवा अन्य कारणाने निधन झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसाला अनुकंपा तत्वावर त्वरित सामावून घ्यावे, सर्व शाळांचे थकीत वेतनेत्तर अनुदान अदा करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.