अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- भिंगार येथील प्रियदर्शनी स्कूल येथे अहमदनगर जिल्हा संघटना आयोजित अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2021 व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये नामांकित टिम टॉपर्स स्केटिंग अकॅडमी व वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये विविध स्केटिंग प्रकारात व विविध वयोगटांमध्ये घेण्यात आल्या होत्या स्पर्धेमध्ये विजय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू 7 ते 9 वयोगटातील
प्रथम क्रमांक- छबी चौधरी, दृतिय- दिवांश कांक्रिया, (इनलाईन गट) दृतिय- आदर्श विश्वास, व 9 ते 11 वयोगटात प्रथम क्रमांक- जागृती बागल, दृतिय- कलश शहा, (इनलाइन गट) दृतिय- रुद्र निकम. 14 ते 17 वयोगटात प्रथम क्रमांक- अब्दुल वाहिद शाह, (राखीव) चैतन्य गुंदेचा.
खुला गट प्रथम क्रमांक- गौरव डहाळे दृतिय- अवेज शेख तसेच अरहम गुगळे, ओंकार राऊत, ध्रुव भळगट यांनी सहभाग नोंदविला होता या सर्व स्केटिंग खेळाडूंचे नगरसेवक गणेश भोसले, अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव आसिफ बाबुलाल शेख, टीम टॉपर्स चे सागर कुकुडवाल, सल्लागार आसिफ शेख, वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक व संचालक सतीश वाकळे पाटील, संदीप वाकळे पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
व टीम टॉपर्स चे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे, राष्ट्रीय खेळाडू ऍड गौरव डहाळे, सह प्रशिक्षक कृष्णा अल्हाट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले वरील सर्व खेळाडू बुरुडगाव रोड येथील पुंडलिकराव भोसले स्केटिंग रिंग व सावेडी उपनगरातील वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लब येथे प्रशिक्षण व सराव करतात.