अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- अनेकदा चोरी होते.. कधीकधी गुन्हेगार पोलिसांच्या हातीही लागतात, परंतु प्रत्येक दाखल गुन्ह्यांमध्ये चोरीमध्ये गेलेला सर्व ऐवज मिळून येतोच असं नाही. अनेकदा तपासामध्ये क्लिष्ट बाबीदेखील असतात, तर अनेकदा गुन्हे लवकर उघड होत नाहीत.
अशा परिस्थितीमध्ये गेलेल्या चोरीच्या ऐवजावर लोकांना पाणी सोडावे लागते. पण कर्जत तालुक्यातील विविध चोऱ्यांमध्ये गेलेला तब्बल साडेबारा लाख रुपयांचा ऐवज परत मिळाल्यानंतर, अपेक्षाही न ठेवलेल्या फिर्यादींच्या हातात सोन्याचे दागिने मिळाले, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
पोलिसांप्रत कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचे डोळे आनंदाने भरून गेले होते…! कर्जत तालुक्यात 5 मे 2021 रोजी मीना सर्जेराव महानवर यांच्या घरात धाडसी दरोडा पडला. रात्रीचे जेवण करून कुटुंबासह सर्वजण घरामध्ये झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात जिन्यामधून प्रवेश केला व मीना महारनवर आणि घरातील कुटुंबीयांना मारहाण करत घरातील कपाटामध्ये असलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 15 लाख रुपये किमतीचा ऐवज दरोडा आणि घरफोडी करून चोरून नेला होता.
हा तपास सुरू असताना गुन्ह्याची पद्धत, या पूर्वीचा गुन्हेगारांचा इतिहास तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आत्ताची कार्यपद्धती आणि त्यांचा वावर या सर्वांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये तपास करत असताना या गुन्ह्याची संशयाची सुई बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिखली येथील एवन काळे याच्याकडे वळली.
पोलिसांना हा गुन्हा एवन काळे यानेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाली. अर्थात एवन ला पकडणे तेवढे सोपे नव्हते पारधी समाजाचे नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच राजकीय नेत्यांत उठबस दाखवणारे होते.
त्यामुळे चेहरे एक आणि कार्यपद्धती वेगळीच अशी यांची पद्धत असली, तरी लोकमानसातील वावर असल्यामुळे सहजपणे पोलिसांना काम करून चालणार नव्हते. त्यामुळे पुरावे गोळा करत पोलिसांनी त्यांना पकडण्याची धडाकेबाज कल्पना आखली.
या पथकामध्ये पोलिस निरीक्षक अनिल कटके, चंद्रशेखर यादव, सहाय्यक निरीक्षक सुरेश माने, फौजदार अमरजीत मोरे, पोलीस जवान सुनील चव्हाण, अंकुश ढवळे, सुनील खैरे, श्याम जाधव, महादेव कोहक, रवींद्र वाघ, जितेंद्र सरोदे, गणेश आघाव, कोमल गोफणे, शाहूराज तिकटे यांचेही पथक होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, दत्तात्रय इंगळे, विश्वास बेरड, ववन मखरे, सचिन आडवल, सुनील चव्हाण, सुरेश माळी, विशाल दळवी, दिनेश मोरे, शंकर चौधरी, राहुल सोळंकी, सागर ससाने, रवींद्र घुंगासे, रणजित जाधव, सागर सुलाने, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, आकाश काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अंकुश ढवळे यांची दोन पथके होती.
तर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयातील संग्राम जाधव, अरुण पवार, सचिन राठोड, संदीप राऊत यांचे एक पथक आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील दादासाहेब टाके, किरण बोराडे, गोकुळ इंगवले यांचे एक पथक अशी मिळून पाच पथके तयार करण्यात आली होती.
हा तपास सुरू असताना गुन्ह्याची पद्धत, या पूर्वीचा गुन्हेगारांचा इतिहास तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आत्ताची कार्यपद्धती आणि त्यांचा वावर या सर्वांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये तपास करत असताना या गुन्ह्याची संशयाची सुई बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिखली येथील एवन काळे याच्याकडे वळली.
आरोपीचे घरावर अचानक छापा घालून गुन्ह्यातील चोरी गेलेला सर्व माल ताब्यात घेऊन 4 आरोपीना अटक करण्यात आले. तात्काळ कायदेशीर प्रक्रिया पार पाडून सदर गुन्ह्यातील माल फिर्यादीला पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परत केला.
फिर्यादीला भावना अनावर झाल्या, त्याच्या डोळ्यात पाणी आले. सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटिल साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. आणासाहेब साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, कर्जत विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली..