पोलिसांना पाहताच तिच्या डोळयात आनंदाश्रू तरळले ! वाचा असे काय झाले….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-हे वाचून कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे काय शक्य आहे. कारण पोलिसांना पाहताच मोठमोठ्या गुन्हेगारांची बोबडी वळते,चकार शब्द न काढणारे पोलिसांच्या केवळ एका कटाक्षाने पोपटासारखे बोलतात.

मग या ठिकाणी असे काय झाले की पोलिस आल्यानंतर तीला आनंद झाला अन् डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ही घटना कर्जत तालुक्यातील आहे. यात नव्याने रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक यादव यांनी तालुक्­यातील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

त्याच वेळी त्यांनी विविध शाळांना भेटी देत, तेथील विद्यार्थिनींशी संवाद साधला असून या दरम्यांना त्यांना छेडछाडीविरोधात धीटपणे पुढे येण्याचे आवाहन करीत वैयक्तिक मोबाईल क्रमांक दिला.

तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्याचा विश्­वास दिला आहे. याची प्रतिची अनेकांना आली आहे. नुकताच तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीची शिकण्याची इच्छा होती मात्र घरातील सदस्यांनी तिचे लग्न करण्याची तयारी केली.

हे सर्व मनाविरुद्ध घडत होते परंतु तिच्यापुढे कोणताच पर्याय दिसत नव्हता. अखेर कंटाळून तिने स्वत:चे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याच वेळी तिला पोलिस निरीक्षक यादव यांच्या त्या शब्दांची आठवण झाली.

मग मनाची तयारी करून तिने यादव यांना व्हॉट्सॲपवर या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. हा मेसेज वाचताच यादव यांनी तत्काळ दोन-तीन पोलिसांना साध्या वेशात सोबत घेत त्या मुलीचे घर गाठले.

तिच्या आई-वडिलांची समजूत घातली. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी माघार घेत, मुलीच्या इच्छेनुसार शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचे लग्न करू असे कबूल केले. त्यांच्या या कबुली नंतर मात्र मुलीचा जीव भांड्यात पडला.

अन् त्याचक्षणी तिच्या डोळ्यंातून आनंदाश्रू वाहू लागले. दरम्यान, आई-वडिलांनाही चुकीची जाणीच झाल्याने त्यांनी देखील मुलीला कुशीत घेत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हे दृष्य पाहून उपस्थितांचे देखील डोळे पाणावले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24