Tecno Phantom V Flip 5G : सर्वात स्वस्त फोल्डेबल फोनच्या विक्रीला सुरुवात, 37500 रुपये वाचवण्याची संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tecno Phantom V Flip 5G : बाजारात आता फोल्डेबल स्मार्टफोन लाँच होऊ लागले आहेत. जर तुम्ही नवीन फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. कारण आता तुम्ही फोल्डेबल फोनवर तब्बल 37500 रुपयांची बचत करू शकता.

नुकताच बाजारात Tecno Phantom V Flip 5G हा फोल्डेबल फोन लाँच झाला आहे. आजपासून त्याच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. परंतु विक्रीच्या पहिल्याच दिवशी सर्वात मोठी सवलत मिळत आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

किती आहे किंमत?

Tecno Phantom V Flip 5G ची आजपासून विक्रीला सुरुवात झाली आहे. कंपनीनं हा फोन 22 सप्टेंबर रोजी लाँच केला आहे. तुम्ही तो अॅमेझॉन वर खरेदी करू शकता. आयकॉनिक ब्लॅक आणि मिस्टिक डॉन या दोन कलर व्हेरियंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे.

कंपनीने फोनचा सिंगल 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशन प्रकार लॉन्च केला असून तो 49,999 रुपयांना उपलब्ध आहे.Amazon फोनवर 37,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. तसेच या फोनवर अनेक बँक ऑफर दिल्या आहेत, ज्या तुम्ही Amazon च्या वेबसाइटवर जाऊन पाहू शकता. तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल तर तुम्हाला 37,500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.

खासियत

या 5G फोनमध्ये गोल AMOLED पॅनल्ससह 1.32-इंच कव्हर डिस्प्ले आणि 6.9-इंचाचा मुख्य AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो फुल एचडी प्लस (2400×1080 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 1000 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कव्हर डिस्प्ले नेहमी चालू असणाऱ्या डिस्प्ले वैशिष्ट्यासह येतो. त्यात मागील कॅमेरा युनिट असून फोन फोल्ड केल्यावर, तुम्ही संदेश पाहू शकता. कव्हर डिस्प्लेवर कॅमेरा आणि संगीत नियंत्रित करता येईल.

रॅम

कंपनीचा हा फोन MediaTek Dimensity 8050 प्रोसेसरने सुसज्ज असून जो Arm Mali-G77 GPU सह जोडण्यात आला आहे. यात 8GB रॅम आहे, ज्यात 256GB इनबिल्ट स्टोरेज असून या फोनमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅमसाठी समर्थन आहे, जे एकूण 16GB पर्यंत रॅम देते. कंपनीचा हा शानदार फोन Android 13 वर आधारित HiOS Flip 13.5 OS वर काम करतो. यात दोन वर्षांचे OS अपडेट्स आणि रिलीझच्या तारखेपासून फोनवर तीन वर्षांचे सुरक्षा पॅच प्रदान करेल.

बॅटरी

फोटोग्राफीसाठी, कंपनीने कव्हर पॅनेलमध्ये मागील कॅमेरा युनिट दिले आहे, ज्यात 64-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आणि 13-मेगापिक्सेलचा वाइड-एंगल लेन्स दिली आहे. फोनच्या मागील बाजूस क्वाड फ्लॅश लाइट्स देण्यात आली आहे.

तर सेल्फीसाठी, ड्युअल फ्लॅश लाइट्ससह अंतर्गत डिस्प्लेमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो पंच-होल कटआउटच्या आत मध्यभागी ठेवला असून या फोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन 10 मिनिटांत 33 टक्के चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.