Tecno Phantom X2 5G : लवकरच लाँच होणार Tecno चा नवीन स्मार्टफोन, मिळणार जबरदस्त फीचर्स

Tecno Phantom X2 5G : भारतीय बाजारात लवकरच Tecno चा नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहे. कंपनी Phantom X2 5G लाँच करणार आहे. कंपनी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते.

नवीन वर्षात म्हणजे हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येईल. परंतु, कंपनीने अजूनही किंमत जाहीर केली नाही. यामध्ये ग्राहकांना नवनवीन फीचर्स मिळणार आहे, कंपनीचा हा 5G स्मार्टफोन असणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतात प्री-बुकिंगसाठी हा स्मार्टफोन 2 जानेवारीपासून Amazon India वर उपलब्ध होणार आतापर्यंत कंपनीने फोनच्या लॉन्चिंगची तारीख आणि किंमत जाहीर केली नाही.

संभाव्य कॅमेरा आणि बॅटरी

कॅमेराचा विचार केला तर यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह येईल. दुय्यम कॅमेरा 13 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेलचा तिसरा सेन्सर मिळेल.

त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 12-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. तर 5,160 mAh बॅटरी आणि 45 वॅट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

संभाव्य स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला यात 4nm प्रोसेसिंग असलेला 5G MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर मिळेल. तर हा फोन 256 GB पर्यंत स्टोरेजसह सुसज्ज असेल, जो मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल. तसेच या फोनसोबत 6.8-इंच फुल एचडी प्लस वक्र AMOLED डिस्प्ले उपलब्ध असेल, जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.