तहसीलदार ज्योती देवरे यांचा सन्मान देवदुतांचा पुरस्काराने गौरव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सन्मान देवदुतांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी झालेल्या या सन्मान सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माध्यम क्षेत्रातील विजयसिंह पटवर्धन, आशुतोष पाटील,

विवेक गिरधारी, डॉ. पी. एन. कदम आदी उपस्थित होते. काेरोना संसर्गाच्या कालावधीत उल्लेखनीय काम केलेल्या राज्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला.

यामध्ये राज्यातील चार जिल्हाधिकाऱ्यांसह ज्योती देवरे या एकमेव तहसीलदारांचा समावेश होता. तालुक्यातील बहुसंख्य नागरिक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्याच्या विविध शहरात, परराज्यात स्थिरावले आहेत.

काेरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर पहिल्या लाटेत लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक तालुक्यात परतले.

त्यामुळे तालुक्यात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावण्याची शक्यता निर्माण झाली होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते तहसीलदार देवरे यांचा सत्कार केला.

अहमदनगर लाईव्ह 24