अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील भीमा नदी व सरस्वती नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ३ वाहनांना तहसीलदार चारुशीला पवार यांनी पथकासह ताब्यात घेतले आहे.
श्रीगोंदा तहसीलदार चारुशीला पवार यांना रात्री पेडगाव येथील भीमानदी व सरस्वती नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांनी रात्री उशिरा त्यांच्या भरारी पथकासह पेडगाव येथे छापा टाकला असता, तेथे त्यांना ३ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक आढळून आल्या.
या तीन ट्रकपैकी एक ट्रक वाळू तस्कराने कारवाई होऊ नये म्हणून चिखलात फसवले होता. मात्र, पवार यांच्या पथकाने रात्री १ वाजेपर्यंत अथक प्रयत्न करून सदर वाहन बाहेर काढले व दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात आणून लावले. तहसीलदारांच्या या धडक कारवाईमुळे वाळूतस्कर चांगलेच धास्तावले आहेत.