अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरातील दानपेटीतील सुमारे २५ हजार रुपयांच्या रोकडसह दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यात चोऱ्यांचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोमवार दि ९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११ वाजेनंतर ते मंगळवार दि १० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ७ वाजे दरम्यान चांदेकसारे
येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घुसून १० हजार रुपये किंमतीची दान पेटी व त्यातील अंदाजे २५ हजार रुपये कींमतीचा रोकड असा एकूण ३५००० रुपये मुद्देमाल लंपास केला.
याबाबत मधुकर शिवाजी होन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २९८/२०२१ नुसार भांदवी कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम. ए.कुसारे करीत आहे.त् घटनेनंतर निरीक्षक दौलतराव जाधव यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.