अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- आंबेगाव तालुक्यातील खडकी गावच्या हद्दीत असलेल्या भराडी ते खडकी रोडवर टेम्पोने समोरा समोर दिलेल्या धडकेत खैरी निमगांवच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत टेम्पो चालकावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,
खडके गावच्या हद्दीत भराडी ते खडकी रोडवर योगेश हरिचंद्र भाकरे हा खडकी ते भराडी रोडने जात असताना खडकी बाजूकडून भराडीकडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने दुचाकीला समोरून धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील योगेश हरीचंद्र भाकरे रा.खैरी निमगांव ता. श्रीरामपूर हा गंभीर जखमी झाला. त्याला मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापुर्वीच मयत घोषीत केले.
घटनेनंतर टेम्पो चालक टेम्पो सोडून पळून गेला. दरम्यान याबाबत योगेशचे बंधु नारायण किसन भाकरे यांच्या फिर्यादीवरून मंचर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अनलॉक नंतर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.