टेम्पो चालकाच्या दारूने घेतला दोघांच्या जीवाचा घोट…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहर हद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीवरील पुलाच्या जवळ एका टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिली.

या घटनेत तालुक्यातील दोन तरूण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली. विलास भानुदास चव्हाण व गोरख गायकवाड असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील दोन तरूण दुचाकीवरून राहुरीकडून राहुरी खुर्दकडे जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या टेम्पोने मुळा नदीवरील पुलाजवळ मोटारसायकलला जोराची धडक दिली.

या भीषण अपघातातमोटारसायकलवरील दोन तरूण जागेवरच ठार झाले. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, तेथील युवकांनी टेम्पोचा मोटारसायकलवर पाठलाग केला.

नांदगाव परिसरात त्या टेम्पोला पकडून टेम्पोचालकाला घटनास्थळी आणले. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टेम्पोचालकाची उपस्थित नागरिकांनी धुलाई केली व त्याला राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेबाबत राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.