अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- संगमनेर मधून मुंबईच्या दिशेने निघालेले तब्बड दिड टन वजनाचे गोवंशाचे मांस घोटी पोलिसांनी आज पहाटे पकडले.
या प्रकरणात घोटी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने अटकेतील दोघांनाही दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आरोपींमध्ये संगमनेरातील एकाचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सिन्नरहून घोटीच्या दिशेने जाणार्या महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास नाकाबंदीत सदरचे वाहन अडकले.
सुरुवातीला वाहनात भाजीपाला असल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांच्या नजरेतून हा प्रकार सुरु शकला नाही. पोलिसांनी वाहनाच्या केलेल्या तपासात बर्फाच्या तुकड्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस दडवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांना दिड लाख रुपये किंमतीचे सुमारे 1 हजार 500 किलो गोवंशाचे मांस आढळले.
या कारवाईत घोटी पोलिसांनी चार लाख रुपये मूल्याचे पांढर्या रंगाचे महिंद्र पिकअप वाहन व दिड लाख रुपयांचे गोवंशाचे मांस असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी घोटी पोलिसांनी अब्दुल मतीन इमानुल्लाह शहा (वय 35, रा.डंपींगरोड, मुंबई),
अहसान लोधी कुरेशी (वय 28, रा.कुर्ला, मुंबई), कमरअली गुलाम कुरेशी (भारतनगर) वसीम कुरेशी (रा.मुंबई) अशा चौघांवर गुन्हा दाखल दाखल करीत पहिल्या दोन आरोपींना अटक करीत आज (ता.23) दुपारी त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी दोन दिवसांसाठी कोठडीत केली आहे.