दहावी-बारावीचे विद्यार्थी म्हणतात, आरोग्याशी खेळू नका, परीक्षा ऑनलाइनच घ्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-मार्चमध्ये जवळजवळ दहा हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोना झाला आहे. या गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत खेळू नये.

परीक्षा ऑफलाइन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. यासाठी ऑनलाइनच परीक्षा घ्या या मागणीसाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी मुंबई आणि पुण्यात शुक्रवारी आंदोलन केले.

शिक्षणमंत्र्यांनी या मागणीचा लवकरात लवकर विचार करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. मुंबईत शिवाजी पार्कवर तर पुण्यात उच्च माध्यमिक बोर्डाच्या ऑफिससमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.

मुंबईतील आंदोलनात ठाणे, नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षा ऑनलाइन घ्यावात अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची आहे.

या आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या } दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा ऑनलाईन घ्या }वर्षभर प्रॅक्टिक्ल झाले नाहीत, लेक्चर ऑनलाईन झाले.

त्यामुळे आमची शालेय फी 70-30 करत परत करावी }सध्याच्या वेळापत्रकात दोन विषयांच्या पेपरमधील अंतर फारच कमी असल्याने ते वाढवावं }ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय काही समजलेच नाही.

तर त्याची परीक्षा कशी देणार? } परीक्षा ऑफलाईन घेत असाल तर विद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षणमंत्र्यानी स्वीकारावी } मार्चमध्ये जवळजवळ दहा हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोना झाला आहे.या गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत खेळू नये.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24