दहावी, आयटीआय उत्तीर्ण आहात ना मग ‘या’ खात्यात नोकरी पक्की!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न देता दहावी किंवा आयटीआयमधील मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून रेल्वेत नोकरी मिळणार आहे.

उत्तर मध्य रेल्वे डीआरएम कार्यालय, झांसी यांनी अॅप्रेंटिस अधिनियम 1961 अन्वये अॅप्रेंटिस पदांसाठी विविध विभागांत भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. 16 एप्रिल 2021 पर्यंत सुरू राहणार आहे.

उत्तर मध्य रेल्वे भरती 2021 च्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांत अॅप्रेंटिसची एकूण 480 पदे भरली जातील. रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा, याचा माहिती अधिसूचनेत दिलेली आहे.

  • फिटर – 286 पदे,
  • वेल्डर – 11 पदे,
  • मेकॅनिक – 84 पदे,
  • कारपेंटर – 11 पदे,
  • इलेक्ट्रिशियन – 88 पदे

ज्या सर्व उमेदवारांनी दहावीची परीक्षा कमीत कमी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि NCVT अधिकृत मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडून ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र घेतले असेल ते या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

केवळ पात्र उमेदवार ऑनलाईन पोर्टलमार्फत ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी mponline.gov.in वर नोंदणी करून अर्ज करावेत. उमेदवाराला सर्व तपशील एकाचवेळी भरावा लागतो. ऑनलाईन अर्जांच्या नोंदणीची अंतिम तारीख 16 एप्रिल 2021 आहे.

सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज फी 170 रुपये आहे, ज्यात 70 रुपये अर्ज शुल्क आणि जीएसटी समाविष्ट आहे. इतर सर्व (अनुसूचित जाती / जमाती / शारीरिक अपंग आणि महिला) उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

उत्तर मध्य रेल्वे अॅप्रेंटिस भरती 2021 साठी पात्र उमेदवारांची यादी गुणवत्ता यादीच्या आधारे जाहीर केली जाईल.

या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवाराला कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. दहावी किंवा आयटीआयमधील उमेदवारांनी मिळविलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24