लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होणार – आ.बबनराव पाचपुते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- कर्जबाजारी शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा डिसेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती.

त्यावर कोणतीच कार्यवाही तर नाहीच, उलट त्यानंतर वादळ, अतिवृष्टीसारख्या संकटांमुळे समस्यांमध्ये भर पडूनही सरकारने मात्र शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे.

महाराष्ट्रातील सर्वात लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होणार आहे, अशी टीका बबनराव पाचपुते यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील संकटग्रस्त शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा विधिमंडळात केली. त्याला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकर्‍याच्या पदरात कर्जमाफी पडलेलीच नाही.

यातच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने केवळ शेतकऱ्यांना आर्थिक आश्वासने दिली.

अतिवृष्टी, वादळांसारख्या संकटात अगोदरच भरडलेल्या शेतकर्‍यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी करून राज्य सरकारने शेतकर्‍यास उद्ध्वस्त केले आहे, अशी घणाघात टीका भाजप आ. बबनराव पाचपुते यांनी केली आहे.

याच अनुषंगाने पुढे बोलताना पाचपुते म्हणाले कि, खोट्या जाहिरातींवर एकशे साठ कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी दीडशे कोटी रुपये कर्जमाफीसाठी दिले असते. तर संकटग्रस्त शेतकर्‍यास दिलासा मिळाला असता.

राज्यातील शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकर्‍यास वेठीस धरले जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24