‘ते’ ४५० रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी खा. उदयनराजेंना परत पाठवले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-लॉकडाऊन विरोधात भीक मांगो करून त्यातून जमा झालेले ४५० रुपये सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठवले होते.

मात्र हे ४५० रुपये जिल्हाधिकारी सिंह यांनी मनिऑर्डर करुन खा. उदयनराजे यांना े परत केले. शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवालही उदयनराजे भोसले यांनी विचारला होता.

राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी उदयनराजे तेथील फुटपाथवर कटोरा घेऊन बसले होते.

लोकांनी त्यांच्या कटोऱ्यात पैसे टाकले होते. ही एकूण रक्कम ४५० रुपये इतकी होती. या आंदोलनात जमा झालेले पैसे उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले होते.

देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे.

लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले होते. माणूस जगण्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे.

मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24