आयटी पार्क खोटच आहे म्हणूनच आमदारांनी किरण काळें समोर खुल्या चर्चेला येण्यापासून पळ काढला ;

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- आयटी पार्क प्रकरणावरून रणकंदन अजूनही संपलेले नाही. काँग्रेसच्या वतीने पोलखोल करत जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आयटी पार्कचे प्रणेते राष्ट्रवादीच्या आमदारांना आयटी पार्कच्या बिल्डिंगमध्ये हिंमत असेल तर समोरासमोर चार दिवसाच्या आत येऊन नगरकरां समोर खुली चर्चा करावी असे आव्हान दोन सप्टेंबर रोजी दिले होते.

आज बारा दिवस उलटले तरी देखील आमदारांची समोर येऊन चर्चा करण्याची हिम्मत झालेली नाही. कारण त्या ठिकाणी आयटी पार्कच नाही. म्हणूनच आमदारांनी काळे यांच्यासमोर खुल्या चर्चेला येण्यापासून पळ काढला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

याबाबत काँग्रेसच्यावतीने ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.

आयटी पार्क पोलखोल प्रकरणानंतर तीन सप्टेंबरला काँग्रेस व राष्ट्रवादीने पत्रकार परिषदा घेत आरोप-प्रत्यारोप केले होते. यावेळी काळे यांचे चर्चेचे आव्हान स्वीकारून आपण चर्चेला जाणार का असे आ. संग्राम जगतापांना पत्रकारांनी विचारले होते. यावेळी जगताप म्हणाले होते की आमची लोक जाऊन चर्चा करतील.

त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतील. मी काही आयटीतील तज्ञ नाही. माझ्या दृष्टीने ते अदखलपात्र आहेत असे म्हणत किरण काळेंवर नाव न घेता टीका केली होती. काँग्रेसने प्रसिद्धीस काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगर शहरात आम्ही आयटी पार्क उभा करत आहोत

आणि केला आहे असे सांगताना आमदारांना आपण आयटीतील तज्ञ नाहीत असे वाटत नाही. मात्र ते खोटे बोलून नगरकरांचे आयटी पार्कच्या प्रकरणावरुन दिशाभूल करत आहेत हे वास्तव काँग्रेसने शहरातील युवकांसमोर आणल्यानंतर मात्र ते मी आयटीतील तज्ञ नाही आणि माझी लोक जाऊन चर्चा करतील असं सांगून केवळ आपलं तोंड लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यांच्याकडे सांगायलाच काही नाही त्यामुळेच ते आयटी पार्क मध्ये चर्चेला यायला तयार नाहीत. ते स्वतः तर आले नाहीतच मात्र त्यांच्या वतीने देखील कुणीही चर्चेला आले नाही. यामुळे यातून काँग्रेसच्या माध्यमातून किरण काळे यांनी आयटी पार्क हा खोटा आहे हे आणलेले वास्तव शतप्रतिशत सत्य आहे.

हे चर्चेला न येऊन त्यांनीच अधोरेखित केले असल्याचे काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हणण्यात आले आहे. किरण काळेंवर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याबद्दल “सत्य परेशान हो सकता है, पराजित नही!”,

“आयटी पार्क पोलखोल प्रकरणावरून किरण काळे यांच्या विरोधात नीच राजकारण करत विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या त्या नीच प्रवृत्तींचा जाहीर निषेध”, अशा आशयाचे फलक, स्टिकर्स शहराच्या विविध भागांमध्ये काँग्रेसच्या युवक, महिला, विद्यार्थी, उद्योग व वाणिज्य काँग्रेस आदी फ्रंटल, सेलच्या वतीने लावण्यात आले आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेले फलक, स्टिकर्स काढण्याची मोहीम सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

ते काढण्याचा जरी त्यांनी प्रयत्न चालवला असता तरी देखील लोकांच्या मनातून किरण काळेंना आमदार कसे काढणार असा सवाल काँग्रेसच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.